गावगाथाठळक बातम्या

Pashan crime: सुस-पाषाण टेकडीवर ट्रेकिंगसाठी आलेल्या नागालँड येथील विद्यार्थ्यांना जबरदस्तीने लुटणारे दोघे चतु:शृंगी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे (प्रतिनिधी): सुस-पाषाण टेकडीवर सायकलिंग ट्रॅकिंगसाठी आलेल्या नागालँड येथील राहणार्‍या विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणार्‍या दोघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

अंजिक्य अशोक बोबडे (वय १८, रा. गुरुकृपा बिल्डिंग, संत तुकाराम नगर, नवी सांगवी) आणि निखील बाबासाहेब डोंगरे (वय १८, रा. साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, औंध) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. याबाबत पौजेंराई कामेई (वय १९, रा. गंगानगर, जुनी सांगवी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पौजेदाई कामेई हे नागालँड येथील राहणारे असून स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सायकलिंग ट्रॅकिंगसाठी सुस -पाषाण रोडवर मित्रासह गेले होते. त्यावेळी चौघा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करुन त्यांच्याकडील दोन मोबाईल व इतर साहित्य असा २० हजार रुपयांचा माल चोरुन नेला होता.

चतु:श्रृंगी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलिसांनी चौघांचा शोध घेऊन त्यांना पकडले. त्यांनी जबरदस्तीने काढून चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल, कोयता असा १ लाख २१ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळकोटगी, विजयानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, किशारे दुशिंग, संदिप दुर्गे, विशाल शिर्के, पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले, प्रदिप खरात, श्रीकांत साबळे, प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button