डॉ. धबाले यांना रमणश्री शरण पुरस्कार
अक्कलकोट
अखिल भारतीय शरण साहित्य परिषद व रमणश्री प्रतिष्ठान बेंगलोर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या या वर्षाचे रमणश्री शरण पुरस्कार घोषित झाले आहे.
येथील खेडगी महाविद्यालयातील कन्नड विभाग प्रमुख डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांना हा पुरस्कार घोषित झाले आहे.
18 नोव्हेंबरला बेंगलोर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन धबाले यांना सन्मानित करणार आहे.
चाळीस हजार रुपये रोख सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
डॉ.धबाले अक्कलकोट व सोलापूर येथील सीमा वरती भागात गेल्या 30 वर्षापासून आपले महाविद्यालयाचे कामकाज करीत शरण साहित्याचे प्रचार , प्रसार व लेखन केलेले आहे. आतापर्यंत त्यांचे 24 पुस्तके प्रकाशित झाले आहे. कलबुर्गी आकाशवाणी मध्ये त्यांचे चिंतन प्रसारित झाले आहे. राष्ट्रीय अंतर राष्ट्रिय व राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये त्यांनी भाग घेऊन संशोधनात्मक प्रबंध त्यांनी सादर केलेल्या आहे. कन्नड दूरदर्शन चैनल वर त्यांचे मुलाखत प्रसारित झाले आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करीत सहा विध्यार्थी संशोधन अध्ययन करीत आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे त्यांनी सदस्य आहेः .अद्याप पर्यंत विविध संस्थेकडून त्यांना एकूण 10 प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहे.
हा रमणश्री प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल खेडगी महाविद्यालचें प्राध्यापक वर्ग अध्यापकेतर कर्मचारी, विध्यार्थी जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवानंद गोगाव सहित अनेक लोकांनी अभिनंदन केले आहेत
Back to top button
×
No WhatsApp Number Found!