गावगाथा

“डॉ. कलाम यांनी देशाला वैज्ञानिक दृष्टी दिली ” प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार

दिन विशेष

“डॉ. कलाम यांनी देशाला वैज्ञानिक दृष्टी दिली “
प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार
——————————————————-

सोलापूर दि.15 भारताचे महान सुपुत्र, माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी जगाच्या पाठीवर भारताला एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळख करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. देशातील तरुणांनी मोठी स्वप्ने ठेवावी व ती पूर्णत्वाला नेण्यासाठी अखंडित पणे स्वतःला झोकून द्यावे. ही खऱ्या अर्थाने देश सेवा आहे. परिश्रमाला दुसरा पर्याय शोधू नका असा संदेश डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिला. असे मननीय विचार संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी श्री सिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय,श्री महालक्ष्मी वाचनालय सोलापूर व श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय श्रीक्षेत्र तीर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात वाचकांशी संवाद साधताना मांडला.
जगणे सुंदर करण्यासाठी, अंतरी आनंद भरण्यासाठी, विचारांची पेरणी करून इतरांची मने जिंकण्यासाठी वाचन चळवळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ऍड. काशिनाथ रुगे, विलास मसरे सर, मल्लिनाथ हिरेमठ, यांनी डॉ कलाम यांच्या जीवनातील रामहर्षक प्रसंग विषद करताना डॉ. कलाम लहानपणी वर्तमानपत्रे घरोघरी टाकत होते. नंतर परिश्रमाने आदरणीय व्यक्ती बनले. ही प्रेरणा तरुणांनी घ्यावी असा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल गुरुनाथ हत्तीकाळे यांनी केले. अतिथी परिचय कुमार जम्मा यांनी करून दिला. आभारप्रदर्शन संचालक श्रीशैल शिळळे यांनी केले
कार्यक्रमास किरण भंडारी,प्रभाकर यादगीर, कुमार दासरी, श्रीशैल स्वामी, मल्लिनाथ हिरेमठ, गुरुनाथ नागठाण, विलास मसरे, श्रीशैल शिळळे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button