गावगाथा

सोलापूर मध्य विधानसभेसाठी प्रमोद मोरे यांच्या नावाची चर्चा,

विजयकुमार देशमुख यांची तगडी फिल्डिंग.

सोलापूर मध्य विधानसभेसाठी प्रमोद मोरे यांच्या नावाची चर्चा,

विजयकुमार देशमुख यांची तगडी फिल्डिंग.

प्रतिनिधी.

कुरनूर:राज्यात विधानसभा निवडणुकीच्या जोरदार चर्चा रंगत आहे त्या दृष्टीने सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे अशातच सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो आता या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे सुपुत्र कथा दत्त कंट्रक्शन चे सर्वेसर्वा प्रमोद मोरे हे उमेदवारी मागून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्या दृष्टीने ते तयारी करत आहेत.सोलापूर मध्ये ची जागा शिवसेनेला सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण सोलापूर दक्षिण आणि उत्तम मतदार संघ हा भाजपचा आहे त्यामुळे मध्यची जागा महायुतीतून शिंदे गटाला सुटणार आहे असे बोलले जात आहे त्यामुळे मोरे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची मागणी केली आहे तसेच दत्त कंट्रक्शन च्या माध्यमातून त्यांचं वलय सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये निर्माण झाल आहे. बांधकाम व्यावसायिक मध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे तसेच स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी कार्यक्रम ते राबवत असतात त्यांच सामाजिक कार्य ही मोठ्या प्रमाणामध्ये पसरले आहे तसेच ते सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे जवळचे मानले जात आहेत त्यामुळे देशमुख त्यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे असे बोलले जात आहे त्यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटल्यास विधानसभा लढणार आणि जिंकणार असा निर्धार मोरे यांनी केला आहे त्यांच्या नावाची चर्चा जोरदार रंगत आहे. येत्या काही दिवसांमध्ये जागावाटप निश्चित होणार आहे त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

स्व. ब्रह्मानंद मोरे मोरे समाज सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोर्चे बांधणी.

लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांच्या निधनानंतर पुढील राजकीय वारसा हे बाळासाहेब मोरे यांनी अक्कलकोट तालुक्यामध्ये चालवत आहेत आता प्रमोद मोरे यांनीही राजकारणात उडी घेत सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघात मोरे यांनी आपले वजन वाढवले असून त्यांच्या सामाजिक कार्याचे ख्याती जिल्हाभर पसरली आहे अनेक सामाजिक कार्य प्रतिष्ठानकडून ते दरवर्षी राबवत असतात त्यामुळे शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवून विधानसभा लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास निश्चितपणे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button