गावगाथाठळक बातम्या
MSRTC Mangalvedha : डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ”वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा ; मंगळवेढा आगाराचा उपक्रम

मंगळवेढा (प्रतिनिधी): दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२४ रोजी राज्य परिवहन मंगळवेढा आगारात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ”वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी आगार व्यवस्थापक श्री.संजय भोसले यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडे २५०० पुस्तकांचा साठा होता. त्यामुळे दैनंदिन जीवनात माणसाने वाचन संस्कृती जपली पाहिजे असे निवेदन केले. सदर कार्यक्रमास सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विठ्ठल भोसले, प्रमुख कारागीर , तुकाराम माने,वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, वरिष्ठ लिपिक अमोल काळे, वाहक सचिन रायबान, भिमराव कदरकर, सविता सुरवसे व सचिन माने हे उपस्थित होते.
