श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील भक्तीमय वातावरण पाहून भारावलो
न्यायमूर्ती एन.माला यांचे मनोगत
(श्रीशैल गवंडी, दि.१७/८/२४) – दत्त उपासनेतून श्री स्वामी समर्थांची आराधना हे संपूर्ण भारतासह दक्षिण भारतातील चेन्नई येथेही मोठ्या भक्ती भावाने होत असते. स्वामी समर्थांचे अनेक भक्त तेथेही आहेत. त्यापैकीच एक आम्हीही स्वामीभक्ती आहोत. श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान अक्कलकोट हे दक्षिण भारतापासून खूप अंतरावर आहे. वेळोवेळी येथील त्यांच्या मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात येऊन दर्शन घेणे शक्य नसले तरी त्यांची आराधना नेहमीच जीवन जगण्यास बळ देते. त्या प्रेरणेतून आज आम्ही प्रत्यक्ष येथील श्री वटवृक्ष मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. येथे आल्यानंतर मंदिरातील श्री स्वामींची आरती, अत्यंत भक्तीमय व भावपूर्ण स्वामींचे दर्शन घेणारे अनेक भक्त, मंदिरातील मन शुद्ध करणारा वातावरण, समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी केलेले आदरतिथ्य, मंदिरात स्वामींचा वास जाणवणारा सहवास हे सर्व भक्तीमय वातावरण पाहून आम्ही भारावलो असल्याचे मनोगत चेन्नई हायकोर्टचे माननीय न्यायमूर्ती एन. माला यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती एन.माला यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायमूर्ती माला बोलत होत्या. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, स्वप्नील मोरे, अविनाश सुरवसे, प्रकाश कुंभार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – न्यायमूर्ती एन.माला यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.