गुरूंचा ध्यास लागल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचे दर्शन घेतले – सी.ई.ओ.दिलीप स्वामी
सी.ई.ओ.दिलीप स्वामी व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230702-WA0064-472x470.jpg)
गुरूंचा ध्यास लागल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचे दर्शन घेतले – सी.ई.ओ.दिलीप स्वामी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(अक्कलकोट, दि.२/७/२०२३)
(शब्दांकन-श्रीशैल गवंडी)-गुरूंचे नामस्मरण, देवाचे दर्शन हे पुण्यकर्म आहे. मन एकाग्र करून गुरूनाम घेत राहिल्याने आत्मिक सुखाची प्राप्ती होते. गुरु हे नेहमीच मार्गदर्शक असतात. गुरु आणि देव जर समोर आले तर प्रथम कोणाला वंदन करावे असे सामान्य माणसाला वाटले, तर प्रथम गुरूंना स्मरा, कारण अनेक गुरूंचे गुरु सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हेच आहेत. त्यांच्या प्रतिमेत ब्रह्मा-विष्णू-महेश सामावले आहेत. त्यांचे नामस्मरण केल्याने जीवन मुक्ती प्राप्त होते. म्हणून जीवनात गुरूंचे स्मरण विशेष महत्त्वाचे आहे. या माध्यमातून गुरुकृपेची प्रचिती येते. माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवनात आजवर अनेक वेळा स्वामी कृपेची प्रचिती आलेली आहे, त्यामुळे आम्ही सर्व स्वामी कुटुंबीय स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत, म्हणून आम्हाला गुरु भेटीची आस नेहमीच लागलेली असते. त्या पार्श्वभूमीवर आज श्री गुरु स्वामी समर्थांचे ध्यास घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेतले असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय.ए.एस. दिलीप स्वामी यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे सहकुटुंब दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिलीप स्वामी व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी दिलीप स्वामी बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – सी.ई.ओ.दिलीप स्वामी व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)