Solapur : रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

सोलापूर दि 18.रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी जाहीर केला.

त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष हनुमंत गिरी , सोलापूर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब ननवरे , सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, सोलापूर जिल्हा सरचिटणीस रमेश भंगे, माढा तालुका अध्यक्ष नागेश गायकवाड , तसेच महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्याही निवडी करण्यात आल्या.

सोलापूर जिल्हा महिला कार्याध्यक्ष तनुजा मुळे, अक्कलकोट तालुका महिला अध्यक्ष शीला बारोळे, दक्षिण तालुका महिला अध्यक्ष सुनंदा हक्के, रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले व राज्य प्रवक्ते तसेच सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा . सुहास पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी पार पडल्या.
