शालेय साहित्य भेटीने विद्यार्थी भारावले
ता. 24 खडकवासला :
पुस्तकासाठी कपाट, संगणक संच, वह्या आणि खाऊची भेट स्विकारताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गुरुवारी भारावले. तसेच भेटीचे स्वागत करत आनंदोत्सवही साजरा केला.
शिवणे येथील डी. एल. एज्युकेशन या संस्थेतर्फे हवेली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा ठाकरवाडी येथे काल संगणक संच, कपाट, वह्या आणि खाऊ देण्यात आला. यावेळी डी. एल. एज्युकेशन संचालक शाम लोले, योगेश देशपांडे, मधुमती लेले, कीर्ती देशपांडे, शिवाजी लोले, विलास देशपांडे, संगरुण केंद्राचे प्रमुख मोहन भालचिम, जि. प. प्रा. शाळा अगळंबेचे मुख्याध्यापक मछिंद्र हिलाळ, ठाकरवाडी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मनीषा बुंदे, सहशिक्षिका देवश्री रेपाळ, नंदा ठाकर आधी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील मुलांना उत्तम पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांनाही तंत्र ज्ञानाचा वापर करता यावा, यासाठी गरजवंत मुलांना आम्ही गेल्या काही वर्षांपासून शालेय साहित्याची भेट देत आहोत. अशा भावना शाम लोले व योगेश देशपांडे यांनी व्यक्त केल्या. मोहन भालचिम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शिवाजी लोले, मनीषा बुंदे, मधुमती लोले यांनी मनोगत व्यक्त केले. मछिंद्र हिलाळ यांनी सूत्रसंचालन केले. देवश्री रेपाळ यांनी आभार मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!