न्यास हे राज्यातील धर्मादाय क्षेत्रातील उत्तम उदाहरण – जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोट न्यायालयाचे स्वप्नील मोरे हे उपस्थित होते

न्यास हे राज्यातील धर्मादाय क्षेत्रातील उत्तम उदाहरण – जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून विविध रुपी सुरु असलेल्या कार्याने न्यास हे राज्यातील धर्मादाय क्षेत्रातील उत्तम उदाहरण असल्याचे मनोगत धाराशिवचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोट न्यायालयाचे स्वप्नील मोरे हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सल्लागार अॅड.संतोष खोबरे, लाला राठोड, संतोष भोसले, गणेश भोसले, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, स्वामिनाथ गुरव, पिंटू साठे, अशपाक काझी, सौरभ मोरे, रोहन शिर्के, अमित थोरात, विकास खंडाळकर, बसवराज मसुते, बाळासाहेब घाडगे, सुराज्य घाडगे, गोरख माळी, समर्थ यादव, विनायक भोसले, रमेश हळसंगी, समर्थ साठे, महादेव अनगले, अभिजित लोकापुरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रविण घाडगे, गोटू माने, डॉ.प्रकाश राठोड, संजय चव्हाण सोलापूर, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
