श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील व वसुंधरेची जपणूक या उत्तुंग कार्याने आह्मी भोसले कुटुंबीय भाराहून गेल्याचे मनोगत पुणेचे प्रसिध्द उद्योगपती अविनाश भोसले
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील व वसुंधरेची जपणूक या उत्तुंग कार्याने आह्मी भोसले कुटुंबीय भाराहून गेल्याचे मनोगत पुणेचे प्रसिध्द उद्योगपती अविनाश भोसले यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत सौ. व श्री विनय काळभोर पुणे हे उपस्थित होते. यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ.व श्री विनाश भोसले यांनी अन्नछत्र मंडळच्या महाप्रसादगृहाच्या प्रतिकृतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लाला राठोड, संतोष भोसले, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, गणेश भोसले, स्वामिनाथ गुरव, पिंटू साठे, अशपाक काझी, सौरभ मोरे, रोहन शिर्के, अमित थोरात, विकास खंडाळकर, बसवराज मसुते, बाळासाहेब घाडगे, सुराज्य घाडगे, गोरख माळी, समर्थ यादव, विनायक भोसले, रमेश हळसंगी, समर्थ साठे, महादेव अनगले, अभिजित लोकापुरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रविण घाडगे, गोटू माने, डॉ.प्रकाश राठोड, संजय चव्हाण सोलापूर, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!