गावगाथाठळक बातम्या

PM Modi : पुण्यात उद्या (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ; हे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद

पुणे (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १२ तारखेला पुण्यात एक महत्त्वपूर्ण सभा घेणार आहेत. ही सभा पुण्याच्या टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेमुळे संबंधित भागातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांना आणि वाहनचालकांना गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

 

या रस्त्यांवर वाहतूक बंद-

 

सभेच्या आयोजनामुळे, सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हे बंद असलेले मार्ग पंतप्रधानांच्या सुरक्षा आणि वाहतूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आहेत. त्यामुळे संबंधित भागात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्वती उड्डाणपुलावरून सिंहगड रस्त्याकडे मार्ग

 

वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून नीलायम चित्रपटगृह मार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करून सिंहगड रस्त्याकडे प्रवास करावा, असे वाहतूक विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. 

 

या मार्गांचा वापर करा-

 

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहनचालकांना योग्य पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. झेंडे यांनी सांगितले की, नाथ पै चौकातून येणाऱ्या वाहनांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे प्रवास करावा, ज्यामुळे वाहतुकीचा त्रास कमी होईल. या बदलांमुळे नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून, वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी-

 

केळकर रोड: टिळक चौक ते भिडे पूल या मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरु ठेवण्यात येईल. या मार्गाचा पर्याय म्हणजे ‘झेड ब्रिज’मार्गे उजवीकडे वळून भिडे पूल जंक्शनला पोहोचणे.

 

गरुड गणपती चौक ते भिडे पूल चौक: या मार्गावर वाहनांची प्रवेशबंदी असेल. पर्यायी मार्गाने गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकाकडे युटर्न घेता येईल.

 

भिडे पूल ते केळकर रोड: डेक्कनमधून थेट केळकर रोडवर जाणाऱ्या वाहनांवर प्रवेशबंदी असेल. पर्यायी मार्गाने भिडे पूल पार करून डावीकडे वळून रिव्हरसाईड रोडकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

एनएस फडके चौक ते नाथ पै चौक: या मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे. पर्यायी मार्ग निलायम ब्रिजमार्गे सिंहगड रोडकडे उपलब्ध असेल.

अंबिल ओढा जंक्शनमार्गे बाबुरा घुले रोड: या रस्त्यावर वाहने जाण्यास बंदी आहे. पर्यायी मार्ग जॉगर्स पार्क रोड व शास्त्री रोडमार्गे वापरता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button