गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: शास्त्रीय गायनासोबत स्वामीभक्ती व स्वामीनाम प्रसार कार्यासाठीच जीवनाची वाटचाल – सुप्रसिद्ध गायक भरत बलवल्ली

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): शास्त्रीय गायनसेवा ही आपली मानस पूजा आहे या गायनसेवेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला नावलौकिक लाभले आहे. ही सर्व माझ्या जीवनावर असलेली स्वामी समर्थांची मोठी कृपा आहे. स्वामी कृपेचा मी अत्यंत ऋणी आहे. या जीवनात शास्त्रीय गायनासोबतच स्वामीभक्ती व स्वामीनाम प्रसार कार्यासाठीच आपल्या जीवनाची वाटचाल चालू असल्याचे मनोगत सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शास्त्रीय गायक भरत बलवल्ली यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी भरत बलवल्ली यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना बलवल्ली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढे बोलताना भरत बलवल्ली यांनी स्वामीभक्ती व नाम प्रसार कार्यात महेश इंगळे यांचे कार्य खुप महान आहे. त्यांच्या या कार्याची पोहोच आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वामींची मुर्ती भेट देवून नरेंद्र मोदी यांना स्वामींच्या जीवन चरित्राची व अक्कलकोट वास्तव्याची तसेच महेश इंगळे व कुटूंबियांच्या स्वामी सेवेची माहीती विस्तृतरित्या दिल्याचं स्पष्टीकरणही भरत बलवल्ली यांनी या प्रसंगी केले. या प्रसंगी प्रथमेश इंगळे, दै.सकाळ समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर अभिजीत पवार, सोलापूर, नगर, साताऱ्याचे संपादक संभाजी पाटील, दै.सकाळ सोलापूरचे वृत्त संपादक वैभव गाढवे, संतोष सावळगी, अजय धाराशिवकर, अक्कलकोट तालुका वार्ताहर चेतन जाधव, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, महेश काटकर, गिरीश पवार, विपूल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button