गावगाथाठळक बातम्या

PCMC : पिंपरी चिंचवडमध्ये महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार… पाहा कधी आणि कुठे होणार सभा…?

HTML img Tag Simply Easy Learning    

चिंचवड (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रखर हिंदुत्त्ववादी नेता अशी ओळख असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, चिंचवडमधील शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदान येथे रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तर भारतातील नागरिकांची संख्या निर्णायक आहे. त्यातच योगी यांना मानणाऱ्या अमराठी लोकांमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे भोसरीतील सभा विक्रमी होईल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून, महाविकास आघाडीला आव्हान देण्याची तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे, सुमारे १ लाख पिंपरी-चिंचवडकर उपस्थित राहतील.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून नागरिक येतील, असा दावा केला जात आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान, शहरातील काही मुस्लिम संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘भगवा जिहाद’ असा नारा हिंदूत्त्ववादी नेत्यांकडून दिला जात आहे. जाती-जातींमध्ये विभागलेल्या हिंदू समाजाने एकजूट करुन राष्ट्रधर्माचे कार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात ‘बटोगे नहीं तो कटोगे नहीं’ असा नारा देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button