77 परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केल्या बद्दल धानय्या कोठगीमठ यांचा के एल ई संस्थेचे चेअरमन डॉ प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सत्कार….
सत्कार सन्मान

77 परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केल्या बद्दल धानय्या कोठगीमठ यांचा के एल ई संस्थेचे चेअरमन डॉ प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सत्कार….
अक्कलकोट. — 77 परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केल्या बद्दल मंगरूळे प्रशालेचे शिक्षक श्री धानय्य कौटगीमठ सर यांचे के एल ई संस्थेचा चेअरमन आदरणीय डॉ प्रभाकर कोरे साहेब यांनी बेळगाव येथे के एल ई संस्थेच्या १०९ वा वर्धापन दिनानिमित्त सत्कार केले.यावेळी केंद्रीय रेल मंत्री आणि जल मंत्री श्री सोमन्ना आणि पुणे रुबी हॉस्पिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ परवेज सर उपस्थित होतेशिक्षण क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हटले जाते, प्रत्येक शिक्षक हा उत्तम समाज घडवीत असतो. शिक्षणसंस्थेच्या प्रगती ही केवळ त्या संस्था मध्ये सेवा करीत असलेल्या शिक्षक वर अवलंबून असतो.के एल ई ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी संस्था आहे.आमच्या संस्था मध्ये सेवा करीत असलेल्या प्रत्येक शिक्षक हा आमचा शान आहे. के एल ई च्या सप्तर्षी च्या आदर्श घेऊन आमच्या संस्थेतील प्रत्येक गुरू सेवा करीत आहे. धानय्य सरांची यश आमच्या संस्थेची गुणवत्ता दाखवितो असे मत डॉ प्रभाकर कोरे व्यक्त केले.
