गावगाथाठळक बातम्या
Akkalkot : महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ उद्या केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तोफ अक्कलकोट मतदारसंघात धडाडणार
अक्कलकोट (प्रतिनिधी): येत्या २० नोव्हेंबर ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभेचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ उद्या (दि.१६) पुण्याचे खासदार तथा केंद्रीय सहकार आणि नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बोरामणी व दुधनी येथे जाहीर सभा होणार आहे.
या सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
ही सभा बोरामणी येथे दुपारी ४:०० वाजता तर
दुधनी येथे सायंकाळी ६:०० वाजता होणार आहे.
अक्कलकोट विधानसभेचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासमोर आपलं गड कायम राखण्याचं आव्हान आहे. त्यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे.