वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिरात ११७ भाविकांनी केले रक्तदान
मंदीर समितीचे बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक

वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

मंदीर समितीचे बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उपक्रमांसह सामाजिक उपक्रमातही मोलाचे योगदान

११७ भाविकांनी केले रक्तदान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.५/५/२०२३) – बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज हे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. देवस्थान व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या दक्षिण महाद्वार परिसरात संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात ११७ भावीक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात मोलाची भूमिका बजावली. या प्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आपल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने वेळोवेळी धार्मिक उपक्रमांसह सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. त्याचेच एक भाग म्हणून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसरात वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. या पार्श्वभूमीवर आज बुद्ध पौर्णिमेरोजी डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर व आपल्या देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदान शिबिर संपन्न झाला असून भाविकांनीही त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे. भाविकांच्या या प्रतिसादामुळे देवस्थानच्या वतीने स्वामी सेवेबरोबरच रुग्णसेवाही जोपासण्यात येत असल्याचे मनोगत व्यक्त करत भविष्यातही जास्तीत जास्त भाविकांनी देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन स्वामी भक्ती, स्वामी सेवेबरोबरच भाविकांनी रुग्णसेवेतही सहभागी व्हावे असे आव्हाने महेश इंगळे यांनी या प्रसंगी केले. रक्तदान शिबिर संपन्न व यशस्वी होण्यासाठी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे कार्यवाहक सुनील हरहरे व सहकारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान नंतर रक्तदात्यांना अल्पोपहार व चहाची सोय करण्यात आली होती. याप्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, चंद्रकांत गवंडी, गणेश इंगळे, मोहन जाधव, प्रसाद सोनार, नरसोबा पवार, प्रसाद पाटील व भावीक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – रक्तदान करताना भाविक दिसत आहेत.
