गावगाथाठळक बातम्या

Mumbai: तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई (प्रतिनिधी): बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यात जॉय वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते तो प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

शिक्षिका तेजस्वी २०१० पासून या क्षेत्रात कार्यरत असून कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक पाठामध्ये नाविन्यता कशी आणता येईल आणि डिजिटल युगाशी कसा कसा संबंध लावता येईल या साठी त्या प्रयत्नशील असतात. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून तो टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम केले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

अनेकदा विद्यार्थ्याना विविध ठिकाणी घेऊन जाऊन प्रत्यक्ष अनुभव देतात.अशा मुलांशी एकरूप होऊन कार्य करणाऱ्या तेजस्वी यांचा अभिमान असल्याचे हिरवे सांगतात.पुरस्कार जाहीर झाल्याने शाळेतील शिक्षक शिक्षकेतर, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक यांनी निवाते टीचर यांचे अभिनंदन केले असून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button