Akkalkot Rural : जेऊरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्रीदेवी राठोड

अक्कलकोट स्टेशन : अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्रीदेवी राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच वृषाली भालेराव राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते.

ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच कमळाबाई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली असून उपसरपंच पदासाठी श्रीदेवी राठोड यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निरीक्षक म्हणून विस्तार अधिकारी पी ,एल कोळी यांनी काम पाहिले. यावेळी वृषाली भालेराव, रोहित भालेराव, सिताबाई चव्हाण, विजय भालेराव, तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत राठोड, गोपीचंद राठोड, चंदू राठोड, पोलीस पाटील विजय चव्हाण, संजय राठोड, दत्तू भालेराव, विलास भालेराव,शिवाजी भालेराव,प्रताप चव्हाण, नामदेव राठोड, विजय आडे, हिराबाई राठोड, ग्रामपंचायत अधिकारी दिनकर बोंडे आदी उपस्थित होते.
