गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: बोरेगाव येथे रिपाइं आठवले गटाचे शाखेचे उद्घाटन

अक्कलकोट (प्रतिनिधी): रिपाइं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे शाखाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला रिपाइंच्या वतीने सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.

गाव तिथे शाखा व शाखा तिथे बोर्ड या माध्यमातून पक्षाला गावा गावात घरा घरात पोहचवण्यासाठी कामाला लागले पाहिजे व तसेच तालुक्यातील विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक बुथ वर रिपाइंचे वीस ते पंचवीस एक्टिव कार्यकर्ते सक्रिय होऊन बुथ यंत्रणा सक्षमपणे राबवावी असे सर्व कार्यकर्त्यांना राजाभाऊंनी आव्हान केले.तसेच यावेळी गुरूसिध्द तुकाराम माने यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वालंब योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विहिरीचे भूमीपूजन राजाभाऊ सरवदे साहेब व तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांंबे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष -अविनाश मडिखांबे

युवक तालुका अध्यक्ष -अप्पा भालेराव

तालुका सरचिटणीस – राजू भगळे ,

तालुका उपाध्यक्ष-संदिप गायकवाड,

रिपाइं अक्कलकोट- शहर अध्यक्ष अजय मुकणार,शहर उपध्यक्ष-सुरेश सोनकांबळे,

सोलापूर रिपाइं शहर प्रसिद्धी प्रमुख

दत्ता कांबळे

मा.शहर संघटक -आण्णा माने

 बोरेगाव शाखा अध्यक्ष-परमेश्वर माने

उपाध्यक्ष -धोडाप्पा माने

आदर्श माने

नामदेव माने

ग्रामसेवक -विशाल धरमसाले 

सरपंच -गौरीशंकर स्वामी

उपसरपंच-नवनाथ जडगे

मा.सरपंच- उमाकांत गाढवे

तंटामुक्त अध्यक्ष -शिवानंद बनसोडे, सदस्य विठ्ठल माने,नामदेव माने,संजय माने,बाळू माने,माणिक देडे, मल्लिनाथ माने,अशोक माने,सुरेश माने,समर्थ बनसोडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button