Murum : छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर संसदेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक अश्विनीताई भोसले यांचा मुलाखतीतून साकारला जीवनपट

मुरूम (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र आयोजित करिअर कट्टा सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कार्यरत करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी यशाची त्रिसूत्री दिली आहे.

पहिले सूत्र म्हणजे प्रत्येक महिन्यात एक पुस्तक वाचावे, दुसरे सूत्र एका यशस्वी व्यक्तीच मुलाखत मुलाखती मधुन जीवनपट वाचावा अथवा समजावा आणि तिसरे सूत्र म्हणजे एका महिन्यात एक नवीन कौशल्य आत्मसात करावे. या त्रिसूत्रापैकी आज करिअर संसदेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी मा. पोलीस निरीक्षक अश्विनीताई भोसले यांच्या मुलाखतीचे आयोजन महाविद्यालय करिअर कट्टा डिजिटल क्लासरूम करण्यात आले होते.


या मुलाखतीमध्ये विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी गणेश मोरे, प्रज्वल चव्हाण , निळकंठ गायकवाड, प्रसाद ममाळे, रणखांब दिपाली, सूर्यवंशी सुशील, पांचाळ भाग्यश्री, सोनटक्के अनुराधा, पाटील अश्विनी यांनी विविध प्रश्न विचारून घेतली मुलाखत. प्राथमिक शिक्षण ते एक प्रशासकीय अधिकारी पर्यंतचा जीवनपट कसा वाटतो? यावर बोलताना अश्विनी मॅडम यानी सातारा येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना करावी लागणारी कामे, कालांतराने मुंबई येथे वास्तव्य केल्यानंतर दुधाच्या पिशव्या, वर्तमानपत्रे विकण्याचेही केलेले काम सांगताना कोणतेही काम करा पण श्रमाला प्रतिष्ठा द्या असा संदेश दिला. या मुलाखततीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतांना अश्विनी मॅडम यानी आपला बालपणापासून ते आजपर्यंतच्या पोलिस प्रशासनातील अनुभव सांगताना एक स्त्री म्हणून प्रशासनात सेवा बजावताना घरातून आलेल्या अडचणी याबरोबरच समाजातून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यावर कशी मात केली, त्याला कसे सामोरे जावे लागले याबाबतचे प्रसंग विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे असेच होते.

जीवनातील अति आनंदाचा प्रसंग कोणता? याबद्दल बोलताना त्यानी माझ ध्येय पूर्ण होऊन प्रशासनातील खाकी वर्दी घातलेला दिवस हा आनंदाचा दिवस होता. कारण पोलिस प्रशासनात जाऊन सेवा करणे हा महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून अभ्यास आणि परिश्रम केले.
म्हणुन विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघायला शिका आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा असे आवाहन केले.
प्रशासकीय सेवा करत असताना काही राजकारणी लोकांचा दबाव येतो का? निश्चितपणे दबाव असतो पण ते पेल ण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. चांगल्या कार्यासाठी काही वाईट प्रसंगांना देखील तोंड द्यावे लागते. त्यामुळे निराश किवा उदासीनता बाळगू नका असाही उपदेश दिला.आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी आपला संदेश काय असेल? विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ, वक्तृत्व, व अन्य कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करा. सोशल मीडिया youtube व्हाट्सअप यावर आलेली सर्वच माहिती बरोबर असतेच असे नाही. त्यामुळे मूळ संदर्भ ग्रंथ अध्ययन करणे महत्त्वाचे आहे. वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. वर्तमानपत्रातील अग्रलेख, वाचकांची पत्रे वाचली पाहिजेत. मॅडमनी प्रशासकीय सेवा करत असताना संत साहित्य यावर पीएचडी प्रबंध सादर केला. मग संशोधन क्षेत्राकडे त्यांना का वळावे वाटले? यावर बोलताना अध्यात्माची आवड असल्याकारणाने मी संत साहित्याची फलश्रुतता या विषयावर पीएचडी प्रबंध सादर केला आहे. विद्यार्थी संसदेच्या विद्यार्थ्यानी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देतांना अश्विनी भोसले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांंना त्यांच्या करिअरची दिशा देणारा असाच ठरला.
या उपक्रमांसाठी महाविद्यालय करिअर कट्टा विद्यार्थी संसदेचे मंत्री आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.
त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ संजय अस्वले, समन्वयक डॉ एस पी पसरकल्ले, डॉ ए. के कटके, डॉ सी डी करे यांचे मार्गदर्शन लाभले l. यावेळी उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले यांची उपस्थिती होती.