
*जिव्हाळा ग्रुप तर्फे रक्तदान शिबिर.*

उदगीर…. जिव्हाळा ग्रुप तर्फे नागपा अंबरखाने रक्त पेढीत श्री सचिन रामचंद्र बापुरे व सौ. आरती सचिन बापुरे यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात जिव्हाळा ग्रुप चे अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर, माजी अध्यक्ष देविदासराव नादरगे,
संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मुडपे उपस्थित होते. रमाकांत बलशेळकीकर म्हणालेकी, रक्तदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळते. रक्तदान करणे म्हणजे माणुसकी धर्माचे पालन करणे. जातपातीचे बंधन तोडणे होय. तीस वेळा रक्तदान करणाऱ्या सचिनचा व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या त्याच्या युवा मित्रांचा देविदासराव नादरगे व विश्वनाथ मुडपेनी सत्कारासह अभिनंदन केले.ह्या रक्तदान यज्ञात नियमितपणे रक्तदानाच्या समिधा टाकणाऱ्या निडेबन येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रिक्षा चालकांना मानाचा मुजरा करण्यात आला. मौज मजा व पार्ट्या टाळून अभिनव वाढदिवस करणाऱ्या बापुरे दाम्पत्याचे कौतुक करण्यात येत आहे.
ह्या शिबिरात निळे संदीप, आच्यारे शरणू, समाधान पानढवळे, हाळ्ळे सिद्धरामेश्वर, अमोल कांबळे, अक्षय बनशेळकिकर, धम्मासागर सोमवंशी, सचिन बापूरे, आरती बापुरे, सायली पाटील, शिवकांत गायकवाड, सुनील अनंतवाळ, कालिदास शिरसे, शिवशंकर ढवळे, लोकेश हिप्पळगे
इत्यादींनी रक्तदान केले.

वरील सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन💐👏☺️
