गावगाथा

सुंदरवाडी येथील श्री दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रम,भक्तिमय वातावरणात संपन्न….

जयंतीनिमित्त विशेष

सुंदरवाडी येथील श्री दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रम,भक्तिमय वातावरणात संपन्न….

HTML img Tag Simply Easy Learning    

(मुरुम प्रतिनीधी ) येथील परिसरातील सुंदरवाडी गावठाण येथील श्री दत्त मंदिरात दि.१४ वार शनिवार रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त विधिवत पूजन, अभिषकांने,विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती साजरी झाली. सण २००० मध्ये याठिकाणी मंदिर स्थापना झालेली असून २००८ साली मंदिर समितीचे स्थापना करण्यात आली. या मंदिराची प्रकाश भीमराव घुले महाराज मंदिर पुजारी म्हणून काम पाहतात. दररोज सकाळी व सायंकाळी ०७ वाजता मंदिरात नित्यनियमाने पूजन व आरती संपन्न होत असते. दि.१४ वार शनिवार रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त दि.०९ डिसेंबर ते १५ डिसेंबर रोजी सुंदर वाडी व मुरूम महिला मंडळाच्या वतीने गुरू पारायण सोहळा संपन्न होत असते. दि.१४ डिसेंबर रोजी अशोक मिणियार यांच्या हस्ते महापूजा व संजय मिणियार यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दि.१५ रोजी प्रकाश महाराज यांचे सुंदरवाडीत माधवगिरी (भिक्षा) व तसेच संजय टेकाळे (अंकल) यांच्या हस्ते महापूजा व आरती आयोजन करण्यात येते.दुपारी पुष्पवृष्टी कार्यक्रम पार पडतो. मंदिर समितीचे वतीने वर्षभर विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रम घेत असतात. श्री दत्त जयंतीनिमित्त भजन,कीर्तन, श्री दत्त पाळणा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. असंख्य भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी असते, ०३ जून रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त मुरूम येथील प्रगतशील शेतकरी अशोक मिणियार यांच्या हस्ते श्री दत्त मूर्तीस अभिषेक करण्यात येते व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असते. मंदिर समितीचे अध्यक्ष योगेश घुले,उपाध्यक्ष सुरेश सुरवसे,सचिव बबन दुधभाते सह सदस्य गण मंदिर उत्सवा निमित्त प्रयत्न शील असतात.

HTML img Tag Simply Easy Learning    

सुरेश बनसोडे, दिपक सुरवसे,डॉ. बळवंत चव्हाण, संजय टेकाळे, अॅड., उदय वैध, मल्लिनाथ मुदकण्णा, प्रदिप पाटील,हणमंत बनसोडे, दशरथ बनसोडे व अध्यक्ष योगेश घुले आणि मंडळ यांच्या उपस्थितीत समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे यांच्या शुभहस्ते पाणी ग्रहण करून प्रकाश महाराज यांचे अनुष्ठान (उपोषण) समाप्ती नंतर बाबुराव जवळकुट्टे, समस्त ग्रामस्थ सुंदरवाडी,मुरूम यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि श्री दत्त जयंती महोत्सवाचे सांगता संपन्न होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिर स्थळी दर्शनासाठी मुरूम शहर,सुंदरवाडी परिसरातील भाविकांची अलोट गर्दी असते, महिला भगिनींचा श्री दत्त जयंतीनिमित्त उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button