*ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते किरनळीचे सुपुत्र चंद्रशेखर भांगे यांचा राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्काराने गौरव.*
पुरस्कार वितरण सोहळा

*ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते किरनळीचे सुपुत्र चंद्रशेखर भांगे यांचा राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्काराने गौरव.*
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या १६ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात अक्कलकोट तालुक्यातील किरनळीचे सुपुत्र आणि लोकशाही न्यूजचे पत्रकार चंद्रशेखर भांगे यांचा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.. यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे, फुलचंद नागटिळक विनोद अष्टुळ यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते..
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात आज मोठ्या दिमाखदार सोहळ्यात हा सत्कार समारंभ पार पडला..

पुण्यातील नामांकित हॉस्पिटल रुबी हॉल क्लिनिक किडनी राकेट, शिक्षक भरती घोटाळा, ससून रुग्णालयात सुरू असलेल्या ललित पाटील ड्रज रॅकेट या सह अनेक रॅकेटचा पत्रकार भांगे यांनी त्यांच्या बातमीदारीतून पर्दाफाश केलाय ..

या सत्कार समारंभाला अक्कलकोट तालुक्यातील प्रा.राहुल रुही ,प्रा. सागर सोनकांबळे, द टाइम्स ऑफ इंडियाचे पुणे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे, मार्केट यार्ड भागातील सामाजिक कार्यकर्ते करण गायकवाड, डॉ. बाळा वाघमारे यांच्यासह अनेकांनी विशेष हजेरी लावली
