गावगाथा

*जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना

*२१ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक :*

*जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.*

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे मार्गदर्शक सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव – २०२४ साजरा करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान प्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात छत्रपती शिवरायांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना सोमवारी सायंकाळी ६ वा. हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थाच्या संस्थापिका अध्यक्षा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्ता अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, माजी नगरसेविका सोनाली शिंदे, रत्नमाला मचाले, स्मिता कदम, पल्लवी कदम, संगिता भोसले, स्वाती निकम, उज्वला भोसले, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, छाया पवार, जयश्री माने, प्रांजली घाटगे, राजश्री माने, स्वप्ना माने, तृप्ती बाबर, कल्पना मोरे, सरोजनी मोरे, धनश्री पाटील, ऋति मोरे, अनिता साळुंखे, दिपाली हत्ते, सुवर्णा धोत्री, प्रमिला देशमुख, मीनल तोरस्कर, माधुरी धर्मसाले, उषा छत्रे, वर्षा चव्हाण, कोमल क्षीरसागर, मल्लम्मा पसारे, मनिषा माळशेट्टी, सुवर्णा साखरे, सुजाता भीमपूरे, सोनल जाजू, अश्विनी निंबाळकर, तृप्ती बाबर, शोभा पोळ, सुवर्णा घाटगे, लता मोरे, जयश्री बिराजदार व सखी ग्रुप, वीरशैव महिला मंडळ, जिजाऊ सखी मंच यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद बिराजदार, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, बाळा शिंदे, प्रविण देशमुख, प्रा.भीमराव साठे, उद्योगपती चंद्रकांत इंगळे, सुभाष गडसिंग, सुधाकर गोंडाळ, अरविंद शिंदे, रवी कदम, नरसिंग क्षीरसागर, प्रा.मनोजकुमार जगताप, बिल्वराज सूर्यवंशी, पै.धनराज भुजबळ, राजाभाऊ भोसले, राम मातोळे, प्रा.अमोल पाटील, प्रसन्न हत्ते, प्रीतीश किलजे, अशोकराव किणीकर, अरुण विभूते, अशोकराव भोसले, अप्पा हंचाटे, अतुल जाधव, विजय लांडगे, सुरेश कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी व सोमनाथ कुलकर्णी यांनी मंत्रांच्या जयघोषात विधीवत्त छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज की जय..! च्या जयघोष व नयनरम्य फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी कु.स्वराज्य कुलकर्णी, कु.सही जगदाळे, कु.श्रध्दा नरके यांचे छत्रपती शिवरायांचे भाषण तर कु.सिध्दी बाबर हिने जिजाऊ स्तुती गायन केले.

याप्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष बाळासाहेब पोळ, उपाध्यक्ष विजय तथा गोटू माने, सचिव अनिकेत (सन्नी) सोनटक्के, खजिनदार शितलबापू फुटाणे, कार्याध्यक्ष अतिश पवार, फहीम पिरजादे, मिरवणूक प्रमुख प्रवीण घाडगे, निखील पाटील, लेझीम संघ व्यवस्थापक वैभव मोरे, सौरभ मोरे, प्रथमेश पवार, समर्थ घाडगे, योगेश पवार, शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख राहुल मोरे, वैभव कामनुरकर, व्यवस्थापक मनोज निकम, राजाभाऊ नवले, नितीन शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, सत्कार प्रमुख आकाश शिंदे, प्रशांत कडबगावकर यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

यावेळी रणजीत गोंडाळ, गणेश भोसले, शिवा मंगरुळे, पिंटू मचाले, वैभव नवभागे, लक्ष्मण विभूते, सागर गोंडाळ, चंद्रकांत कुंभार, संजय गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, समर्थ घाडगे, किरण साठे, पिंटू साठे, विनायक तोडकर, सागर शिंदे, दिनेश बंडगर, सुराज्य घाडगे, अतिश पवार, युवराज सोनटक्के, केदार तोडकर, विकास गडदे, स्वामीराव मोरे, वासू कडबगावकर, महेश दनके, संजयकुमार बडवे, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह अमोलराजे भोसले लेझीम संघाचे सदस्य व युवक कार्यकर्ते बहुसंख्याने उपस्थित होते. दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या शिवस्मारक, शिवसृष्टी, श्री स्वामी समर्थ वाटिका, आश्रयदाते कक्षातील छत्रपतींच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले. दरम्यान श्री कमलाराजे चौकातील शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठापना व पूजन आधारस्तंभ अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

*⭕चौकट :*
*२१ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक :*
बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार असल्याचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब पोळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button