गावगाथा

*श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ*

वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२४

*श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ*
वागदरी ता अक्कलकोट येथे श्री एस एस शेळके प्रशालेत आंतरवर्गीय क्रीडा सप्ताहास दि.१८/१२/२०२४ पासून सुरूवात झाली असून सप्ताहाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन श्री दिनकर जावळे सर माजी मुख्याध्यापक, माजी सरपंच व संस्थेचे संचालक श्री रविकिरण वरनाळे, माजी सरपंच श्री श्रीकांत भैरामडगी व विद्यमान उपसरपंच श्री पंकज सुतार उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविकिरण वरनाळे यांनी भूषविले. क्रीडा सप्ताहाचे ध्वजारोहण श्री दिनकर जावळे सर यांच्या हस्ते पार पडले राष्ट्रगीत, राज्यगीत व क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अनिल देशमुख सर व पर्यवेक्षिका सौ शैलशिल्पा जाधव मॅडम, क्रीडा प्रमुख श्री पंचप्पा सोनकवडे सर आणि सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, खेळाडू, विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विद्याधर पुजारी सर यांनी केले तर स्पर्धेच्या आयोजन – नियोजनाची माहिती क्रीडा प्रमुख श्री पंचप्पा सोनकवडे सरांनी सांगितले श्री दिनकर जावळे सरांनी खेळाडूंना खेळ आणि खेळाविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका च्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले उपस्थितांचे आभार श्री श्रीशैल वाघमोडे सरांनी मानले सर्वांच्या उपस्थित मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अशारितीने क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आले

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button