“गावगाथा” दिवाळी अंकाला ‘स्पंदन सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्काराने सन्मानित….
पुरस्कार वितरण सोहळा

“गावगाथा” दिवाळी अंकाला ‘स्पंदन सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्काराने सन्मानित……

अक्कलकोट — तालुक्यातील वागदरी येथून प्रकाशित होणारे”गावगाथा” दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष असून ग्रामीण संस्कृती, रूढी, परंपरा व ग्रामीण साहित्य, यासोबत ग्रामीण भागातील लेखकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मागील तीन वर्षांपासून दिवाळी अंक प्रकाशन केले जात आहे. वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ, दर्जेदार साहित्यामुळे अल्पावधीतच गावगाथा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत गावगाथा दिवाळी अंकाला ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी संपादक धोंडप्पा नंदे, प्रा.शिवशरण धड्डे सहाय्यक प्राध्यापक कृष्णा विद्यापीठ कराड यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन, प्रमुख पाहुणे श्री गुरु ष.ब्र.प्र.108 राष्ट्रसंत पद्मभास्कर डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज (मठाधिपती तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर ता.पाटण, जि.सातारा महाराष्ट्र) मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांना गौरविण्यात आले.

तसेच सुप्रसिध्द पार्श्व गायिका कविता राम, सुप्रसिध्द मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, सुप्रसिध्द अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगिता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री, रील स्टार अंजली आकळे, शिवम असोसिटसचे गुलाब जाधव, डॉ.संदीप डाकवे व अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. संदीप डाकवे यांनी, सूत्रसंचालन शितल दवणे आणि आभार प्रदर्शन भीमराव धुळप यांनी केले.
