अक्कलकोट तालुक्यातील तंत्रशिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना इंगळे पॉलिटेक्निकचे आधार – डॉ.विजय कोल्हे
स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.विजय कोल्हे यांचे मनोगत

अक्कलकोट तालुक्यातील तंत्रशिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना इंगळे पॉलिटेक्निकचे आधार – डॉ.विजय कोल्हे

स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.विजय कोल्हे यांचे मनोगत

(अ.कोट, श्रीशैल गवंडी, दि.२५/१२/२४) महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेले व अक्कलकोट तालुक्यातील
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने व स्वामींच्या छत्रछायाने वलयांकीत असलेले कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन हे अक्कलकोट तालुक्यातील एकमेव तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या या अक्कलकोट तालुक्यातील कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात तंत्र शिक्षण घेण्याकामी इच्छुक असलेले अनेक विद्यार्थी आहेत, त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कै.कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक हे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठे आधार असल्याचे मनोगत पुणे विभागीय कार्यालयाचे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.विजय कोल्हे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.विजय कोल्हे यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी डॉ.कोल्हे बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजय पवार, जनगोंडा, सर, रविंद्र नष्ठे, उमेश सोनवणे,
खिलारी सर, चित्तरंजन अगरथडे आदीसह महाविद्यालयाचे अन्य स्टाफ व देवस्थानचे सेवेकरी उपस्थित होते.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात डॉ.विजय कोल्हे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
