समर्थांची कृपासावली हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य – प्रा.डॉ.यशपाल खेडकर
समर्थांची कृपासावली हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य - प्रा.डॉ.यशपाल खेडकर

समर्थांची कृपासावली हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य – प्रा.डॉ.यशपाल खेडकर

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२५/१२/२४)
ब्रम्हांडनायक दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांची कृपासावली हेच आमच्या कुटुंबीयांच्या जीवनाचे सर्वात मोठे भाग्य असल्याचे विचार पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (SVERI) चे प्राध्यापक डॉ.यशपाल खेडकर यांनी मांडले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.यशपाल खेडकर व त्यांच्या धर्मपत्नीचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी डॉ.खेडकर बोलत होते. पुढे बोलताना डॉ.खेडकर यांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीभावातून लाभलेल्या सद्बुद्धीने व ज्ञानार्जनाने श्री.विठ्ठल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेत ज्ञानदान करण्याचे काम स्वामींच्या कृपेने माझ्या हातून घडत असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष फुटाणे, मारुती बावडे, प्रसाद सोनार, संजय पवार, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, प्रफुल जाधव, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, आदिसह खेडकर कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो ओळ – प्राध्यापक यशपाल खेडकर यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, राजीव माने व अन्य दिसत आहेत.
