गावगाथा

निर्मलाराजे कन्या प्रशालेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राजीव मानेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार.

राजीव माने यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, संतोष फुटाणे, बाळासाहेब एकबोटे, मारुती बावडे व अन्य दिसत आहेत.

निर्मलाराजे कन्या प्रशालेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राजीव मानेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार.

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि- २५/१२/२४) येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांचा मराठा मंदिर मुंबई संचलित येथील निर्मलाराजे कन्या प्रशाला या माध्यमिक प्रशालेचे स्थानिक सदस्य म्हणून निवड झाल्याप्रित्यर्थ श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी राजीव माने हे तालुक्यातील शिक्षण प्रणालीवर विशेष लक्ष ठेवून धोरणात्मक काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. याचा ध्यास घेऊनच मराठा मंदिरच्या वतीने मराठा मंदिर संचलित येथील निर्मलाराजे कन्या प्रशालेवर त्यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे मनोगत व्यक्त करून राजीव माने यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, संतोष जाधव-फुटाणे, संचालक चव्हाण, मारूती बावडे, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, दर्शन घाटगे, तुषार मोरे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – राजीव माने यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे,
संतोष फुटाणे, बाळासाहेब एकबोटे,
मारुती बावडे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button