सावित्रीबाई फुले यांचे कार्य वंदनीय .. मलकप्पा भरमशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम..

सावित्रीबाई फुले यांचे कार्य वंदनीय ..
मलकप्पा भरमशेट्टी

कल्याणशेट्टी
महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम..

अक्कलकोट:

सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचे द्वारे खुली केली. त्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली, म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे. असे प्रतिपादन प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास अभ्यास मंडळ यानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा. मनीषा शिंदे,प्रा विद्याश्री वाले,प्रा नेहा गंदमल, प्रा. प्राची गणाचारी, प्रा.विद्या बिराजदार,प्रा. जनाबाई चौधरी,प्रा शितल फुटाणे आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन सावित्रीबाईंनी परंपरावादी बुरसटलेल्या विचारसरणी विरुद्ध लढा उभा केला. स्त्रियांना शिक्षण देऊन सामाजिक प्रवाहात आणले. त्यामुळे स्त्री-पुरुष भेदभाव नाहीसा होण्यास मदत झाली. आणि पुरोगामीत्वाची वारे वाहू लागले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जनाबाई चौधरी यांनी केले सूत्रसंचलन प्रा विद्याश्री वाले यांनी केले, आभार प्रा विद्या बिराजदार यांनी मानले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी व मान्यवर..