डॉ.रामलिंग पुराणे उमरगा तहसील कार्यालया अमोर आमरण उपोषण..तहसीलदार यांच्या लेखी आश्वसनांनंतर उपोषण माघे…
उपोषण

डॉ.रामलिंग पुराणे उमरगा तहसील कार्यालया अमोर आमरण उपोषण..तहसीलदार यांच्या लेखी आश्वसनांनंतर उपोषण माघे…

उमरगा ता. मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे यांनी दि.१० जानेवारी पासून शेतकरी,होमगार्ड, जुनी पेन्शन योजना विषयाचे विविध मागण्या घेऊन उमरगा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडला होता. शेतकऱ्यांना शेत रस्ता, हमीभाव,भूसंपादन केलेल्या जमिनीचा मावेजा पूर्णपणे भेटला का याची चौकशी, पाणंद रस्ता, शेतकरी माहिती मदत केंद्र,आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबला आर्थिक मदत, होमगार्डना ३६५ दिवस काम, कायद्यात बदल, १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबतच्या मागण्या घेऊन दि.१० वार शुक्रवार रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात आला होता. या आंदोलनास शेतकरी,मराठवाडा विकास प्रतिष्ठाण, मराठा सेवा संघ सह विविध सामाजिक संघटनेचा पाठिंबा व समर्थन मिळाला. तहसीलदार गोविंद येरमे यांच्या लेखी आश्वसनांनंतर उपोषण माघे घेण्यात आला. यावेळी गोविंद येरमे यांनी तहसील अंतर्गत येणाऱ्या कामाची तात्काळ दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल व त्याच बरोबर शासन दरबारी असणाऱ्या विषया संदर्भात पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण माघे घेण्यात आले. यावेळी सुजित शेळके, सिद्धेश्वर भालेराव, श्रीकांत बेंडकाळे, प्रकाश इंगोले,श्रीधर इंगळे, सुनील खंडागळे,डिंगबर सोनटक्के, प्रकाश इंगोले, महादेव मेनसे,शिवपुत्र सोलापूरे, बिराजदार, राजू स्वामी,राचय्या स्वामी,मनोज खंडागळे, महेंद्र कांबळे, मल्लिनाथ जेऊरे, मल्लय्या स्वामी आदीसह शेतकरी बांधव बहूसंख्येने उपस्थित होते.
