गावगाथा

मानवी जीवनातील कला म्हणजे परिसच -माधव राजगुरू

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेचे उद्घाटन करताना कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी

मानवी जीवनातील कला म्हणजे परिसच -माधव राजगुरू

मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद व अंगभूत असलेल्या कला ह्या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे असतात.त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणे चे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनानिमित्त रांजणगाव येथील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
बालकुमार संस्थेच्या शिरूर शाखेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील ७६ शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.
बालकुमार साहित्य संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे यानिमित्ताने संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर शिरूर शाखेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली,अशी माहिती शिरूर शाखाध्यक्ष राहुल चातुर यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमासाठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे चे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, ज्येष्ठ समाज प्रबोधनकार उत्तम अण्णा भोंडवे, शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पलांडे, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूरचे अध्यक्ष मनोहर परदेशी, केंद्रस्तरीय सदस्य सचिन बेंडभर, पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण कोकाटे, केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे, संचालक रामचंद्र नवले इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वरा भुजबळ, आराध्या गावडे, नियती कटारिया, अधिरा शेळके, शौर्य कळसकर, आरुष चव्हाण, आरुष लोखंडे, तेजस्विनी चिकटे, तेजस्विनी शिंदे, स्वरा पवार, सान्वी अडसूळ, शौर्यप्रताप कळसकर, सर्वज्ञ वाळके, अनिष्का पऱ्हाड, स्वरांजली भागवत, रूची निषाद , अन्वी गायकवाड, सृष्टी बोऱ्हाडे, श्रेयश शिंदे, अस्मिता नळकांडे, ईश्वरी उबाळे, सह्याद्री वीर, अदिती गायकवाड ,अंबिका पवार, स्वानंद दंडवते, शर्वरी गुंड, प्रगती वानखेडे, देवांशी झांजे इत्यादी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये गडकोट किल्ले संवर्धन व पर्यावरण जतन याबाबत विशेष मोहीम राबवल्याबद्दल शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक उमेश धुमाळ व विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण निर्माण करण्यासाठी लाठीकाठी व योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबद्दल किरण अरगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी म.सा.प. शिरूर चे कार्याध्यक्ष कुंडलिक कदम , बालकुमार संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव मांढरे ,कार्यवाह विवेकानंद फंड ,उपाध्यक्ष गुरुनाथ पाटील ,कोषाध्यक्ष संभाजी चौधरी, कार्यकारणी सदस्य शेखर फराटे, आकाश भोरडे,विठ्ठल वळसे तानाजी धरणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कवी मनोहर परदेशी व बालकवी अनिष्का पऱ्हाड यांनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली
युवा उद्योजक कवी मयूर करंजे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button