वंचितची माघार ; कॉंग्रेसचा रस्ता सुकर, सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट
सोलापूर लोकसभेत एक नवा ट्विस्ट आला आहे. त्याला कारणही तसाच आहे. कारण वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज भरलेले राहूल गायकवाड यांनी आपला अर्ज माघारी घेऊन सोलापूरच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आणला आहे.

राहूल गायकवाड यांच्या माघारी नाट्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आता वंचितची मतं ही थेट काॅंग्रेसच्या ताटात पडणार आहेत. एकीकडे सोलापूर शहरात धडाडीच्या आमदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे तर दुसरीकडे भाजपाकडून नवीन चेहरा म्हणून देण्यात आलेल्या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात दुरंगी लढत आहे. एकंदरीत शहर भागात प्रणिती शिंदेंचा दबदबा असला तरी ग्रामीणमध्ये काॅंग्रेसला थोडासा अवघड जाण्याची शक्यता वाटते . याउलट ग्रामीण आणि उत्तर सोलापूर भागात भाजपचा दबदबा असल्याचा पहायला मिळत आहे. मात्र तरीही यंदाची निवडणूक ही काटें की टक्कर असणार आहे, यात शंका नाही.

मागील निवडणुकीचा निकाल पाहता काॅंग्रेसला वंचित मुळेच पराभव पत्करावा लागला, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळेच आता राहूल गायकवाड यांनी माघार घेत काॅंग्रेससाठी रस्ता सुकर करून दिला आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

– दयानंद गौडगांव
