स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार कार्यात इंगळे कुटुंबियांचे अमूल्य योगदान – विद्या पोकळे- पाटील
विद्या पोकळे-पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार कार्यात इंगळे कुटुंबियांचे अमूल्य योगदान – विद्या पोकळे- पाटील

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२/४/२४)
श्री स्वामी समर्थांचे असंख्य भक्त संपूर्ण देशभर व विदेशातही आहेत. स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना उत्तम स्वामी दर्शनाची नियोजन व्यवस्था हे वटवृक्ष मंदिरातील खास वैशिष्ट्य आहे. मंदिर समितीच्या या कार्यात इंगळे कुटुंबीयांची चौथी पिढी स्वामी सेवेत कार्यरत आहे. गतकाळात देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांनी स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्याची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर महेश इंगळे हे आपल्या असंख्य जनसंपर्काच्या माध्यमातून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व अक्कलकोटचे नाव जागतिक स्तरावर उज्वल करीत स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्य विस्तारित करण्याचे गौरवस्पद कार्य करीत आहेत, त्यामुळे स्वामी भक्तीच्या प्रचार प्रसार कार्यात इंगळे कुटुंबीयांचे अमूल्य योगदान असल्याचे मनोगत महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे संपर्क प्रमुख तथा पश्चिम महाराष्ट्र ग्राहक सेवा संस्था पोलीस गर्ल्स संघटनेचे युवती अध्यक्ष विद्या पोकळे-पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी विद्या पोकळे-पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी पोकळे-पाटील बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, मोहन जाधव, प्रसाद सोनार, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – विद्या पोकळे-पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
