गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे जनमेजयराजे भोसले महाराज यांना ‘समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर : “अन्नछत्र मंडळाचे कार्य पाहून मी धन्य झाले”

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे जनमेजयराजे भोसले महाराज यांना ‘समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर : “अन्नछत्र मंडळाचे कार्य पाहून मी धन्य झाले”
अक्कलकोट (प्रतिनिधी) —
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांना ‘समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. गोवा येथील पणजी येथे शुक्रवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने हा भव्य कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
“मी दरवर्षी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येते. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य पाहून मी भारावून जाते. ‘अन्न हे प्रत्येकाला मिळाले पाहिजे’ ही माझी भावना आहे, आणि जनमेजयराजे भोसले हे ही भावना प्रत्यक्षात उतरवत आहेत. लाखो भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करून त्यांनी समाजात अद्वितीय उदाहरण ठेवले आहे. गोव्यात त्यांच्या कार्याचा सन्मान होत असल्याने मला अत्यंत आनंद वाटतो.”
या कार्यक्रमास माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, सिने अभिनेते ‘अर्जुन फेम’ फिरोज खान, दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, गोव्याचे उद्योगपती बाबूसाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, कवी अरुण म्हात्रे, समाजसेविका चित्रा शिरसाट, ज्ञानेश्वर जावीर, अॅड. भारत पवार, हिम्मतराव भाकरे, भीमराव मोरे, अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप सिध्दे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिलीप सिध्दे यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत जनमेजयराजे भोसले यांच्या सेवाकार्याची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाला अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मनोद्दीन कोरबू, शहराध्यक्ष शिवराज स्वामी, सरफराज शेख, पिंटू साठे, खजिनदार लाला राठोड, रमेश हलसंगी, संतोष माने, गोकुळ पाटील, असद फुलारी, आकाश उदगिरे, पत्रकार रमेश भंडारी, स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप, प्रविण पुल्लूर आदींसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button