गावगाथा

*दक्षिण सोलापुर बेलाटी येथे मार्ग फॉउंडेशनच्या महिला शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न..*

याप्रसंगी बेलाटी गावा मधील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*दक्षिण सोलापुर बेलाटी येथे मार्ग फॉउंडेशनच्या महिला शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न..*

दक्षिण सोलापुर मतदारसंघातील बेलाटी येथे मार्ग फॉउंडेशनच्या महिला शाखेचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.आजच्या २१ व्या शतकात भारत देशातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.

आमच्या ग्रामीण भागातील भगिनी सुध्दा मागे राहता कामा नये हा उद्देश नजरेसमोर ठेवून मार्ग फाऊंडेशन महिला सक्षमीकरणाचं काम करून महिलांना ह्कांच व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे माता -भगिनींसुध्दा स्वतःहून पुढाकार घेऊन नव्या बदलांना सामोरं जायची तयारी ठेवली तरचं समाजाचा उत्कर्ष होईल.
येत्या काळात मार्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.याप्रसंगी महिला शाखा पदधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तुम्ही मार्ग फाऊंडेशनशर व्यक्त केलेला विश्वास इतर माता-भगिनींनी कार्य करण्यासाठीप् प्रेरणा व बळ देत राहील यात तिळमात्र शंका नाही.याप्रसंगी बेलाटी गावा मधील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button