आर्य क्रीडा मंडळ आणि चाकण ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” भव्य रक्तदान शिबिर आयोजन..
शिबिरामध्ये अमृत महोत्सव निमित्त 76 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230917-WA0112-780x470.jpg)
आर्य क्रीडा मंडळ आणि चाकण ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” भव्य रक्तदान शिबिर आयोजन..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
शिबिरामध्ये अमृत महोत्सव निमित्त 76 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
आर्य क्रीडा मंडळ आणि चाकण ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन मा. डॉ. सुरेश गोसावी सर (कुलगुरू) यांचे शुभहस्ते आणि मा. डॉ. अविनाश कुंभार (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग), मा. डॉ. बाबासाहेब दुधभाते (इतिहास विभाग) यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. सेवक चाळीतील सेवक, त्यांचे पाल्य आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. शिबिरामध्ये अमृत महोत्सव निमित्त 76 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. आपल्या विद्यापीठाच्या सन्मानाकरिता रक्तदान करणार-या सर्व रक्तदात्यांचे मंडळ आभारी आहे.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
*रक्तदान शिबिर सोहळ्याचे सुत्र संचालन श्री. बसवंत गजलवार, अतिथींची ओळख आणि स्वागत डॉ. उमेश कसबे, आभार प्रदर्शन श्री. योगेश काळभोर यांनी केले. सर्व अतिथींना श्री. मनिष गायकवाड (अध्यक्ष) यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यात संतोष सुगावे, राहुल चांदेरे, रुपेश कदम, स्वानंद उत्तेकर, अजिंक्य काशिद, आर्यन सागरे, ओंकार बोत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले मंडळ त्यांचे ऋणी आहे. असेच सहकार्य यापुढेही मिळावे हीच सदिच्छा…!
*(शशिकांत जाधव)*
*सचिव*