ग्रामीण घडामोडी

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे अप्पू उर्फ सातलींगप्पा परमशेट्टी तर उपसभापती पदी सिद्धाराम बाके यांची बिनविरोध निवड

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती

अक्कलकोट दि.११:- दुधनी ता.अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे अप्पू उर्फ सातलींगप्पा परमशेट्टी तर उपसभापती पदी सिद्धाराम बाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होताच कार्येकर्त्यांनी एकच जल्लोष करीत गुलालचे उधळण करीत फटकाचे आतषबाजी केली.
नूतन पदाधिकारी यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी शाल, श्रीफळ, हार, गुच्छ देऊन सन्मानित केले. नूतन संचालक मोतीराम राठोड, विश्वनाथ इटेनवरू, सुवर्णा मचाले, अस्विनी सालेगाव, बहिदपाशा शेख, निगणा पुजारी, सिद्धाराम तोळणूरे,देवेंद्र बिराजदार, कोगनुर, यांचेही सन्मान आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजशेखर जोशी,
सिद्धरामेवर प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रारंभी दीपप्रज्वलन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, आप्पासाहेब पाटील, प्रदीप पाटील, गिरमल डोंगरींतोट, सुरेखा होळीकट्टी, यशवंत धोंगडे, जगन्नाथ राठोड, सुनीता परमशेट्टी,रमेश उप्पीन, मुंबईचे उधोगपती अमित प्रतापसिह, महेश पाटील, शिवशरण जोजन,अण्णाराव बाराचारी, सागर कल्याणशेट्टी,रुपा गायकवाड, ज्योती उन्नद, दौलतराव हौदे, विवेकानंद उंबरजे, तुकप्पा नागुर, सुरेश नागुर, व्यावरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी,उपाध्यक्ष गुरुषांतप्पा परमशेट्टी,कांतू धनशेट्टी, शंकर भांजी, बसवराज हौदे, दयानंद बिडवे, दयानंद बमनळळी, रजाक सय्यद, अभिजित पाटील, डॉ काळे,अप्पू बिराजदार ,चंदू दसले,वसीम मुल्ला, मल्लिनाथ भासगी आदीजण उपस्थित होते.
याप्रसंगी महेश हिंडोळे, जगन्नाथ राठोड, दिलीप शावरी, शिवबसप्पा सबसगी, नूतन सभापती अप्पू परमशेट्टी यांचेही मनोगत झाले

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button