गावगाथा

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे वतीने स्वामी भक्तांच्या सेवेकरिता भविष्याचा वेध घेत व्यापक विकास कामे हाती घेतली आहे ही बाब उल्लेखनीय – खासदार संजय दिना पाटील*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे वतीने स्वामी भक्तांच्या सेवेकरिता भविष्याचा वेध घेत व्यापक विकास कामे हाती घेतली आहे ही बाब उल्लेखनीय – खासदार संजय दिना पाटील*

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांच्या सेवेकरिता भविष्याचा वेध घेत व्यापक विकास कामे हाती घेतली जात असून, ही बाब उल्लेखनीय असल्याचे मनोगत मुंबईचे नूतन खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, अभियंता किरण पाटील, सुनील खवळे, संतोष भोसले, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button