पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात कुर्ल्याची पंतवालावलकर शाळा सर्वोत्तम
विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी झाला
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231016-WA0071-780x470.jpg)
पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात कुर्ल्याची पंतवालावलकर शाळा सर्वोत्तम
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
कुर्ला तालुक्यातील शांताराम कृष्णाजी पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय नेहरूनगर कुर्ला शाळेची पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात सर्वोत्तम शाळा म्हणून निवड झाली आहे. पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केला जाणार आहे.
विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय न करायचे हे समजण्यासाठी महत्त्वपूर्ण होता. कारण या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे किंवा संदेश देणारे दूत नसून कळत-नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. ६४ हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल – तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्याथ्यांनी गांधीगिरी’ करत इतरांनी केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून ‘लेट्स चेंज’ फिल्ममधील सरदार पटेलबाजी’ करत घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित आहे.स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंवा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येते. आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हिडिओ करून सोशल मीडियाला शेअर करणे त्यांच्या आवडीचे काम बनून जाते. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केला जाणार आहे.कुर्ला तालुक्यातील शांताराम कृष्णाजी पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय नेहरूनगर कुर्ला या शाळेला शंभर पैकी पहिल्या ३० व्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्याबद्दल राज्यातील मुंबईत आयोजित कार्यक्रमात शाळेचा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव यादव सर यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. शाळा समन्वयक श्री.दयानंद खरात सर आदींनी नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन करत होते. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव श्री.सत्येंद्र सामंत, अध्यक्ष श्री.नरेंद्र सामंत, खजिनदार श्रीमती स्नेहल सामंत, उपमुख्याध्यापिका श्रीम.ज्योती नेमाडे मॅडम, पर्यवेक्षक श्री. पाचरणे सर, श्री.शिंदे सर, श्रीम.कर्पे मॅडम सर्व समिती तर्फे या उपक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सर्वोत्तम १०० च्या यादीत समाविष्ट आहे. त्याचबरोबर निवडक विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर’ ओळखपत्राने गौरवण्यात येणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)