तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ” शेळके प्रशालेने” मारली बाजी… प्रशालेच्या प्रतिभा व्हनकोरे व शरणाबाई बाळीफडे यांच्या वैज्ञानिक उपकरणाला मिळाला तालुक्यातून प्रथम क्रमांक
कै.कोंडीबा इंगळे हायस्कूल कर्जाळ येथे आज संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ” शेळके प्रशालेने” मारली बाजी… प्रशालेच्या प्रतिभा व्हनकोरे व शरणाबाई बाळीफडे यांच्या वैज्ञानिक उपकरणाला मिळाला तालुक्यातून प्रथम क्रमांक


पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्यावतीने कै.कोंडीबा इंगळे हायस्कूल कर्जाळ येथे आज संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात *श्री एस एस शेळके प्रशालेतील इयत्ता दहावी मधील प्रतिभा बसवराज व्हनकोरे व शरणाबाई परमेश्वर बाळीफडे* या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या “हरित ऊर्जेचा वापर करून विद्युत वाहनांची निर्मिती” या वैज्ञानिक उपकरणाला(प्रोजेक्टला) माध्यमिक विभागातून *अक्कलकोट तालुक्यातून प्रथम क्रमांक* मिळाला आहे. आणि त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास निवड झाली आहे .ह्या यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार इंगळे हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत इंगळे व गटशिक्षणाधिकारी श्री प्रशांत अरबाळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी केंद्रप्रमुख बा.ना चव्हाण, केंद्रप्रमुख बसवराज मुनोळी, श्री दयानंद किवडे, श्री गुरुनाथ नरूणे उपस्थित होते..

सदर विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षक ईमाम कासिम बागवान, शिवशरण गवंडी, प्रदीप पाटील,दत्तात्रय होटकर,शिवलिंगप्पा गंगा,आरती बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.सदर यश मिळविलेल्या या विद्यार्थिनींचे संस्थेचे चेअरमन श्री बसवराज शेळके सावकार,संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य अनिल देशमुख,पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
