
“वीरशैव सेवा मंडळाच्या वतीने तीळगुळ वाटप समारंभ संपन्न “
—————————————————
*मन मोकळे केल्याने जीवन आनंददायी बनते –प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार*
सोलापूर दि. 19. मनातल्या भावना इतरासमोर व्यक्त केल्याने आनंद द्विगुणित होतो, दुःखाची धार कमी होते. जगणे हवे हवेसे वाटते, जगण्यासाठी बळ मिळते. इतरांना समजून घेण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी आपल्या पूर्वजानी सांगितलेल्या मार्गानी आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी वीरशैव सेवा मंडळ आयोजित तीळगुळ देवाणघेवाण समारंभात केले.
यल्लालिंग नगरातील मठात नागरिक मोठ्या संख्येने तीळगुळ समारंभासाठी आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्रामय्या स्वामी यांनी मन्त्रोचारातून करून सणाचे महत्व सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व संस्थेचे माजी अध्यक्ष सिद्धराया दुलंगे यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व नागरिकांनी एकमेकांना तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या गोड बोलाचा संदेश दिला.
अध्यक्षीय समारोप करताना सिद्धराया दुलंगे म्हणाले की, वीरशैव सेवा मंडळाचे कार्य अनुकरणीय आहे.असे सांगून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी
मनोहर तेलसंग यांनी इंग्लंड दौऱ्याचे अनुभव सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीशैल शिळळे यांनी केले कार्यक्रमास विश्वनाथ मेरकर, संगमेश्वर पायमल्ले, सिद्रामय्या स्वामी, शिवराज चडचणकर, सूत्रेश्वर स्वामी, सुरेश चिक्कळी, गुरुनाथ हत्तीकाळे व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
