जि प प्रा शाळा चपळगाववाडी, रेवणसिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय येथे शिवजयंती साजरी
शिवजयंती उत्सव विशेष



चपळगाववाडी—येथील छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती जि प प्रा शाळा चपळगाववाडी ता.अक्कलकोट येथे व श्री रेवणसिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय, चपळगाववाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री अनसर नदाफ व माजी अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्डाळे यांच्या हस्ते शिवप्रभूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी श्री तुकाराम जाधव सरांनी शिवप्रभूंच्या कार्याची थोरवी आपल्या कवितेतून गायिले.कु.अर्पिता माशाळकर हिने शिवा काशिद शिवरायांच्या वेषात सिद्दी जौहरच्या भेटीला जातो तो कथानक आपल्या ओघवत्या भाषाशैलीत उपस्थितांसमोर मांडून टाळ्या मिळवल्या.


तसेच यल्लप्पा बन्ने,ओम माशाळकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री स्वामीनाथ परशेट्टी,माजी अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्डाळे यांनीही आपल्या मनोगतात शिवप्रभूंवर स्तुतीसुमने उधळली.यावेळी महम्मद नदाफ,अनिल दसाडे,पैगंबर नदाफ,श्री बाबूराव इटगाळे,नागप्पा सौदागर,कल्लप्पा चिट्टे, मल्लप्पा कोरे,राजशेखर बन्ने मुख्याध्यापक श्री शिवशरण गोविंदे,सहशिक्षक श्री तुकाराम जाधव , बहुसंख्य पालक,ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
