Akkalkot: स्थानिक भाविकांना दर्शनासाठी नियोजन वटवृक्ष मंदिर समितीचे स्वागतार्ह कार्य – ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्थानिक स्वामी भक्तांकरिता सकाळी ६ ते ९ या वेळेत स्वामींच्या दर्शनाकरिता विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे स्थानिक भाविकांना दर्शनासाठी करण्यात आलेले हे नियोजन म्हणजे मंदिर समितीचे स्वागतीय कार्य असल्याचे मनोगत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी ह.भ.प.औसेकर महाराज बोलत होते.

पुढे बोलताना ह.भ.प. औसेकर महाराज यांनी सकाळच्या सत्रात भाविकांना दर्शना करिता सोडण्याचा उपक्रम आम्ही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही राबवित आहोत. त्यामुळे भाविक समाधान व्यक्त करीत आहेत. अशा उपक्रमांनी पंढरपूर असू द्या अथवा अक्कलकोट असू द्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धा जोपासण्याचे काम या मंदिर समितींकडून होत असल्याचे मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ह.भ.प.आबा महाराज कुरनूरकर, पत्रकार मारुती बावडे, प्रशांत गुरव,मोहन चव्हाण, श्रीकांत मलवे,

मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर सर, अमर पाटील, सागर गोंडाळ, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.
