गावगाथा

कुंभेजच्या कु.श्वेता शिंदे हिच्या यशाबद्दल श्री.वटवृक्ष मंदिरात सन्मान.

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील यशाबद्दल झाला सन्मान.

कुंभेजच्या कु.श्वेता शिंदे हिच्या यशाबद्दल श्री.वटवृक्ष मंदिरात सन्मान.

HTML img Tag Simply Easy Learning    

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील यशाबद्दल झाला सन्मान.

HTML img Tag Simply Easy Learning    

फार्मा मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग मध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट)
(दि.२६/०१/२०२५) ——- परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवीमध्ये फार्मा मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विषयामध्ये अव्वल क्रमांक १ ने कुंभेजच्या कु.श्वेता शिंदे या विद्यार्थिनीने यश संपादन केले आहे.
विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात असोसिएट डीन व प्राचार्य डॉ.रामटेके, डॉ.भोसले, डॉ.खोडके मॅडम, डॉ.मोरे, प्रो.पाटील यांच्या उपस्थितीत कु.श्वेता शिंदे हिला नुकतेच सनद प्रदान करण्यात आला.
कु.श्वेता शिंदे हिच्या यशाप्रित्यर्थ येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन कु. श्वेता शिंदे हिचा यथोचित सन्मान केला. कु.श्वेता शिंदे ही विद्यार्थीनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त
व करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे मामा प्रा.संपतराव शिंदे यांची मुलगी आहे. कु.श्वेता शिंदेने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे वडील संपतराव शिंदे, महेश इंगळे, चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी संजय पवार यासह यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, अहिल्यानगर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रा.नंदकुमार कुमार निगडे-देशमुख, प्रा.राजाराम माने, विजय काकडे, विजयसिंह देशमुख, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड, पक्षी मित्र कल्याणराव साळुंके, गोपाळ पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कु.श्वेता शिंदे हिचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, संपतराव शिंदे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button