पाचगणीतील निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे हिवाळ्यात भटकंतीचा प्लॅन करताय? साताऱ्यातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या…
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/11/pachgani-780x470.jpg)
पाचगणीतील निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे हिवाळ्यात भटकंतीचा प्लॅन करताय? साताऱ्यातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या…
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
हिवाळ्यातील गुलाबी थंडीत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्याने कुणी बाईक तर कुणी चारचाकी गाडीतून फिरायला जायचा प्लॅन हा करत असतील तर त्यांच्यासाठी हि माहिती खूप उपयुक्त ठरेल. हिवाळा ऋतू असल्याने सध्या सर्वत्र गुलाबी थंडी पडत आहे. या थंडीत दुसरी तिसरीकडे न जाता सातारा जिल्ह्यातील अशा एका ठिकाणी जावा कि त्या ठिकाणी तुम्हाला खूप एन्जॉय करता येऊ शकेल.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा प्रसिद्ध असलेल्या अशा पाचगणीचे सौंदर्य सध्या चांगलेच खुलून गेले आहे. या ठिकाणी निसर्गातील अप्रतिम असा नजारा पहायला मिळत आहे. निसर्गाचा अद्भूत चमत्कार काय असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे होय.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील पाचगणी हे एक थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरबरोबर पर्यटक हे पाचगणीला आवर्जून भेट देतात. या ठिकाणी आल्यास पर्यटकांना गुलाबी थंडीचा चांगला अनुभव घेता येईल. सध्या पाचगणी व महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून दोन्ही गिरिस्थाने गारठली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
पर्यटकांची चांगली पसंती
सर्व ऋतूंपेक्षा हिवाळ्यात जास्त करून पर्यटक या ठिकाणी भेटी देण्यासाठी येत असतात. शनिवार आणि रविवार आला कि पर्यटकांची व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पाचगणीच्या दिशेने पाऊले वळू लागतात. सध्या पाचगणीत पर्यटकांची गर्दी झाली असून, थंडीमुळे बरेच पर्यटक नियमित स्ट्रॉबेरी जाम खरेदीबरोबरच थंडीपासून बचावासाठी असणारी स्वेटर, सूती टोप्या, कान टोप्या, मफलर शाल खरेदी करताना दिसत आहेत. गरमा गरम चहा, मक्याची तवावर भाजलेली कणसे, गरम चणे खाण्यात पर्यटक दिसत आहेत. काही नागरिक शेकोट्या पुढे बसून शेकत थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
कास पठारही आकर्षणाचे ठिकाण
साताऱ्याला कास पठारापासून फक्त 24 किलोमीटर अंतरावर आहे, ज्याला कास पठार असेही म्हणतात. या क्षेत्राच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. 1,000 एकर पसरलेले आणि 1200 मीटर उंचीवर असलेले हे भव्य ज्वालामुखीय लॅटरिटिक पठार, त्याच्या समृद्ध, चमकदार किरमिजी रंगाच्या मातीमुळे पावसाळी-हंगाम पिकनिक स्पॉट्ससाठी ओळखले जाते. या ठिकाणी रंगबीरंगी फुलामध्ये व हिरव्या गवतात फिरण्याचा आनंद प्रयत्न घेऊ शकतात.
प्री-वेडींग फोटोशूटसाठी सर्वोत्तम
महाबळेश्वरपासून जवळच असलेल्या पाचगणी येथील निसर्गाच्या सानिध्यातील सुद्धा अनेक ठिकाणं आहेत. टेबललॅण्ड तसेच इतर ठिकाणीही तुम्हाला प्रीवेडींग फोटो शूट करता येईल. याच बरोबर सातारा जिल्ह्यात अशी काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी प्री वेडिंग शूट करता येऊ शकते. सातारा जिल्ह्यातील वाई येथे गणपतीच प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच वैशिष्टय अस आहे की,या मंदीराच्या परिसरातील कृष्णा नदीचा घाट प्रीवेडींगसाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे. तसेच हिलस्टेशन म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये प्री वेडींग फोटोशूट केले जात आहे. शिवाय कास पठार,ठोसेगर धबधबा तसेच जिल्ह्यातील बामणोली लेक परिसरात तलावात फोटोशुट करता येते.
कसे पोहोचाल?
पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी हे पुणे विमानतळापासून 110 किमी अंतरावर आहे.पाचगणीला रेल्वेने जायचे असेल तर अगोदर सातारा येथे रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. सातारा रेल्वे स्टेशनपासून पाचगणी 52 किमी दूर आहे. आणि रस्त्याने दुचाकी किंवा चारचाकी वाहनांनी जायचे असेल तर महाबळेश्वर हे पुणे पासून 121 किमी दूर आणि सातारा पासून 56.6 किमी दूर आणि कोल्हापूर पासून 178 किमी दूर आहे.