माजी.आमदार सिद्धाराम म्हेत्रेंच्या हस्ते महेश इंगळेंचा सन्मान महेश इंगळेंच्या वाढदिवसाप्रित्यर्थ केला सन्मान प्रतिनिधी अक्कलकोट,
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221119-WA0037-780x470.jpg)
मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रेंच्या हस्ते महेश इंगळेंचा सन्मान महेश इंगळेंच्या वाढदिवसाप्रित्यर्थ केला सन्मान
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
प्रतिनिधी अक्कलकोट,
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी महेश इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन देवस्थान कार्यालयात सन्मान केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी महेश इंगळे यांचे वडील कै.बाळासाहेब इंगळे यांच्या कार्यकाळापासून इंगळे कुटुंबीयांची स्वामी सेवा मोठी आहे. महेश इंगळे यांना यापुढेही मंदिर समितीच्या माध्यमातून स्वामी सेवा करण्याची व मंदिर समितीच्या कार्याचा मोठा विस्तार करण्याचे बळ स्वामी समर्थांनी त्यांना द्यावी असे मनोगत व्यक्त करून महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, श्रीकांत मलवे, मैनोदिन कोरबू, विश्वनाथ हडलगी, रामचंद्र समाणे, शिवशरण अचलेर, रवि मलवे इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना मा. आमदार सिद्धाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.