ग्रामदैवता

ऐतिहासिक नाविंदगी गावचे जागृत प्रभुलिंगेश्वर देवस्थान!

Story Highlights
  • ऐतिहासिक नाविंदगी गावचे जागृत प्रभुलिंगेश्वर देवस्थान!/ग्रामदैवत

ऐतिहासिक नाविंदगी गावचे जागृत प्रभुलिंगेश्वर देवस्थान!!!

नाविंदगी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.अक्कलकोट तालुक्यातील सर्वात पुरातन गाव म्हणुन ज्या गावाची ओळख आहे.या गावात प्राचीन काळापासून वास्तूशिल्प वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंती मंदिरे,गुफा आणि बांधीव विहीर आढळतात.नाविंदगी गावामध्ये आदी अनादी काळापासून आध्यात्मिक पंडित जनसमुदाय असलेले गाव इ.स.८०० पूर्वी पासून या काळात महात्मा बसवेश्वरांचे सहकारी अनुभव मंडप चे प्रथम अध्यक्ष अल्लमप्रभु महान व्यक्ती या गावात वास्तव करून गेले असे नाविंदगी गावातील जुन्या पिढीतले लोक कथा,कांदबरी व नाटका मध्ये उल्लेख वर्णन केलेले दिसून येते तसेच या नंतरच्या काळात हि या गावा मध्ये थोर महात्मा,संत होऊन गेलेले निदर्शनास येते.


पुरातन मंदिरा पैकी महत्त्वाचे असलेले श्री प्रभुलिंगेश्वर मंदिर असून ग्रामदैवत श्री प्रभुलिंगेश्वरांचे यात्रा महोत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा गुडीपाडव्या म्हणजे (उगादी हब्बा) पासून पाच दिव उत्सव होते.हि यात्रा महोत्सव प्राचीन काळापासून मंदिरात धार्मिक लहान मोठे उत्सव होत असतात.यात पालखी महोत्सव,दुसऱ्या दिवशी श्री प्रभुलिंगेश्वरांचे रथोत्सव,नंदीध्वज इतर उत्सव होतात तसेच दरवर्षी श्रावण मासात अनुष्टान,जप तप,महारुद्रभिषेक मोठ्या उत्साहाने केले जातात.याच दरम्यान गावातील हनुमान मंदिरात महाप्रसाद,पाळणा,कुस्ती व सामाजिक कन्नड नाटक मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होत असतात.तसेच श्री प्रभुलिंगेश्वरांचे उत्तरा नक्षत्राचा प्रारंभ झाल्यावर पहिल्या सोमवारी श्री प्रभुलिंगेश्वरांचे भव्य पालखी उत्सव व गावातील सर्व पुरातन मंदिराना महारुद्रभिषेक करून मोठ्या उत्साहाने भक्तीमय वातावरणात समारंभ होत असतात.
नाविंदगी गावात इतर सण उत्सव वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्याची पद्धत आहे.दसरा(नवराञ)सण मोठ्या भक्तीने साजरा केले जातात.गावामध्ये पंचाचार्य हिरेमठ असून ब्र.श्री रुद्रमुनी शिवाचार्य महास्वामीजी ची पुण्यतिथी कार्यक्रम हि तिथीप्रमाणे साजरा केले जाते.तसेच दरवर्षी डिसेंबर महिन्यात १६ तारखेपासून जानेवारी १४ तारखे पर्यत श्री तपोभुषण ष.ब्र.गुरूशांतलिंग देशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी मांजरी.ता – निपाणी यांच्या दिव्य सानिध्यात महिनाभर तपोनुष्टान उत्सव मोठ्याने साजरा होत असते.
तसेच दरवर्षी महाशिवराञी श्री प्रभुलिंगेश्वर महारुद्रभिषेक करून भजन,जागरण सह इतर धार्मिक कार्यक्रम होतात.ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेले नाविंदगी गावात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भक्तीमय वातावरणात संपन्न होतात.सर्व धार्मिक उत्सव गावातील सर्वच जाती धर्मातील लोक एकत्र येऊन साजरा करतात.एक प्रकारे धार्मिक जातीय ऐकोपा यातून प्रामुख्याने दिसते.
सण,उत्सव साजरा करण्याचा मुख्य हेत्तू हाच असतो यातून एकतेचा संदेश दिला जातो.प्रत्येक गावाचा एक वैशिष्ट्ये व तेथील रुढी परंपरा वेगळे असतात.हिच तर ग्रामीण संस्कृती आहे.विविधेतून एकता दर्शवते.नाविंदगी गाव सुद्धा पुरातन संस्कृती परंपरा जपत आहे.
दरवर्षी प्रमाणे गुडीपाडव्याला नाविंदगीत श्री प्रभुलिंगेश्वरांचे उत्सव सुरू होतं आहे.यंदा कोरोना मुळे साध्या पद्धतीने उत्सव संपन्न होणार आहेत…सर्व नागरिकांना गुडीपाडव्या च्या प्रभुलिंगेश्वर याञा निमित्त हार्दिक शुभेच्छा..

संकलन —-✍️✍️
धोंडप्पा नंदे,संतोष राठोड,
विशेष सहकार्य!!!
सिद्धाराम हळतोट
ता- अक्कलकोट ,जिल्हा सोलापूर …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button