संपूर्ण अक्कलकोट शहर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पोलिसांच्या निगराणी खाली सुरक्षित राहणार
शहर सुरक्षा

आता संपूर्ण अक्कलकोट शहर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पोलिसांच्या निगराणी खाली सुरक्षित राहणार

अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राजेंद्र टाकणे साहेब यांनी तत्कालीन पोलिस निरिक्षक सूरज बंडगर साहेब यांनी अक्कलकोट शहर व स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा व स्पीकर बसवण्यात आले होते ते त्यातील काही कॅमेरे बंद पडले होते ते दुरुस्ती करून अक्कलकोट शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यसाठी सदर सीसीटीव्ही कॅमेरा व स्पीकर दुरुस्ती करून स्वामी समर्थ मंदिर परिसरातील कायम होणारा ट्रफिक जाम सुधारण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत या सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीकर च्या साह्याने हा परिसर कायम ट्रॅफिक मुक्त होइल व स्वामी भक्तांसाठी दर्शना साठी सोईस्कर देखिल होइल हे पाहून आनंद वाटला आणि नक्कीच याचा फायदा अक्कलकोट शहरातील सर्वच घटकांना होईल असा विश्वास अक्कलकोटकर करत आहेत तसेच स्वामी भक्तांना हि सदर स्पीकरने ट्रॅफीक सुरळीत करण्यासाठी मदत होईल थेट त्या गडीवाल्यापर्यंत पोलिस निरिक्षक यांनी बोललेला आवाज त्याच्या पर्यंत पोहचणार आहे त्यामुळे प्रत्येक गाडी पार्किंग च्या ठिकाणी लावली जाईल त्यामुळे रस्त्यावर होणारा ट्रॅफिक जॅम होणार नाही. या संपूर्ण अक्कलकोट शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्या बद्दल अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब यांचे या चांगल्या उपक्रमाबद्दल अक्कलकोट चे रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांंबे व शहर अध्यक्ष अजय मुकणार यांनी अभिनंदन केले.
